Ad will apear here
Next
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

लोणावळा : येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ध्वज फडकवून योजनेच्या प्रार्थना गीताद्वारे अभिवादन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘आजचा युवक, त्याची दशा व दिशा’, तसेच ‘औषधे घेताना घ्यावयाची काळजी’ या विषयांवरील पथनाट्ये सादर केली. मावळ वार्ताचे प्रमुख कार्यक्रमाचे प्रदीप वाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी प्रदीप वाडेकर म्हणाले, ‘आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे.’


सिंहगड संकुलाचे संचालक व प्राचार्य डॉ. माणिक गायकवाड यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्य, कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, डॉ. जयवंत देसाई, डॉ. शिवाजी देसाई, प्राचार्य डॉ. मोरेश्वर महाजन, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, पंकज जाधव, विजय वसेकर यांच्यासह फार्मसी कॉलेज व कॉमर्स कॉलेजमधील स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. सुमित देवर्षी, संतोष दबडे, विशाल माळी व अन्य स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZQXCE
Similar Posts
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स दिन’ साजरा कुसगाव : येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नुकताच ‘मेकॅट्रॉनिक्स दिन’ साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या २१ गटांनी भाग घेतला.
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मिनी टेकफेस्ट कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स क्लबच्या वतीने २१ ते २३ सप्टेंबर या कालवधीत ‘मिनी टेकफेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. तीनशेहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता दिन साजरा कुसगाव : येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता दिन आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉग्निझंट इंडियाचे संचालक क्रिस सॅम्युअल उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले.
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language